दिव्यांगजनांना होत असलेल्या अडचणी

 दिव्यांग हा समाजातील दुलक्षित घटक असल्याचे आज पण जाणवते. ही बाब १९७० अगोदर खूप प्रकर्षाने जाणवायची. नंतर १९९५ चा कायदा आला व आपले दिवस चांगले येतील अशी एक भावना प्रत्येक दिव्यांगजन यांची मनात पल्लवित झाली. हळूहळू जाणवायला लागलं की कायदा हा फक्त कागदावरच ठेवण्यासाठी बनवला आहे की काय ? त्यानंतर काही सामाजिक संघटना, खास करून अंध व्यक्तीसाठी झटणाऱ्या, पुढे आल्या.......त्या नंतर २००५ चा दिव्यांग कायदा अस्तित्वात आला. पण दिव्यांग हिताचं काम कागदावर जास्त व प्रत्यक्षात कमी असाच अनुभव येत होता. कामचुकार पणा केल्यास कडक कारवाही चे प्रयोजनाचा अभाव हे त्यामागील एक कारण असू शकते. एक गोष्ट मात्र नक्की होती, दिव्यांगजन यांना आपल्या प्रत्येक हक्कासाठी कोर्टात धाव घ्यावी लागत होती व आज पण घ्यावी लागते. कोर्ट हे दिव्यांगजनासाठी मायबाप म्हणूनच राहिले व आज पण आहे. २०१६ चा दिव्यांग हक्क कायदा, हा दिव्यांग हितासाठी एक मैलाचा दगड बनला. हे सर्व होऊन पण उदासीन प्रशासन व शासन यांच्यामुळे, आज पण दिव्यांग हक्कच विनासायास भेटत नाही, ही एक सत्य परिस्थिती व शोकांतिका आहे. हळूहळू बदल होत असले तरी आणखीन खूप काही होणं जरुरी आहे.

दिव्यांग आरक्षणाचा मुद्दे पण शंभर टक्के तंतोतंत वापरला जात नाही, होय कारण कायद्यातील सोईस्कर कलम वापरायचे व इतर कलमे टाळायची असंच दिसून येत. प्रत्येक दिव्यांगजन यांना नोकरीत साठी नियुक्ती होत असताना १० वर्ष वयाची सूट द्यावी असे कायद्यात नमूद केले आहे व ती सूट अगदी सहज दिली पण जाते , मग त्याच कायद्याचे दुसरे कलम, जे सवलती व रिलॅक्षेशन बद्दल लिहले आहे, त्याचा वापर किती ठिकाणी झाला ? नौकर भरती करत असताना जर पूर्ण संख्येत दिव्यांग हजर नसतील तर, नियमात सवलत देऊन किती दिव्यांग भरती केली गेली ? का नाही केले जात नियम शिथिल ? का ती जागा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केली जाते ? झोन वाढवून भरती करावी, हे एक कलम दिव्यांग कायद्यात नमूद केले आहे, किती भरती दरम्यान या कलमाचा योग्य वापर होतो ? काहीं नौकर भरती ही तंतोतंत नियमानुसार होते, पण ते प्रमाण किती आहे ? 

रेशन कार्ड असो की दिव्यांग भत्ता असो, सर्व ठिकाणी मिळवून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करावाच लागतो

रेल्वे रिझर्वेशन असो की एसटी चे तिकीट, दररोज अनेक दिव्यांग यांना त्रास व तुसडी वागणूक सहन करावी लागते, हे कधी थांबणार ?

दिव्यांगजन यांच्या समस्येसाठी व त्यावरील उपाय शोधण्यासाठी मी सदरील ब्लॉग सुरू केला आहे, विविध विषयांवर व अडचणी लिहणार आहे. कोर्ट ऑर्डर्स, दिव्यांग कायदा व त्यातील प्रत्येक कलम या बद्दल सविस्तर लिखाण करण्याचा मानस आहे, तसेच विविध योजना, त्याबद्दल ची माहिती, विविध शासकीय परिपत्रके या बद्दल प्रत्येक दिव्यांगास माहिती मिळावी, हा माझं प्रयत्न राहील

टिप्पण्या