पोस्ट्स

दिव्यांगजन यांच्या वाहनांच्या आरसी कार्ड वर दिव्यांगजन ownership लिहण्यासाठी, अडचण का ?

 दिव्यांगजन यांना प्रत्येक कामात अडथळे येतात हे आता सर्वजनांना रोजचेच झाले आहे. मग ते कोणतेही कार्यालय असो....... दिव्यांगजनांच्या नशिबी हेलपाटे हे ठरलेलेच आहेत. आरटीओ कार्यालयाचे उदाहरण घेऊ. भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MVL विभाग) परिवहन भवन, 1, संसद मार्ग, नवी दिल्ली यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२० म्हणजे आज पासून कमीतकमी अडीच वर्षांपूर्वी एक परिपत्रक काढले, प्रति क्रमांक RT - 11036 / 57 / 2020 - MVL , या नंबर चे.  या परिपत्रकात सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचे परिवहन आयुक्त यांना सूचित करण्यात आले. की ज्यांच्या वाहनांच्या मालकीचा प्रकार दिव्यांगजन आहे अशा वाहनांसाठी सुविधा देण्यात याव्या. केंद्रीय मोटार वाहन नियम ( CMVR ) , 1989 च्या फॉर्म 20 च्या क्र. 4A मध्ये मालकी म्हणून दिव्यांगजन नोंद करून द्यावी. या परिपत्रकाचा अभ्यास असलेले व माहिती असलेले काही दिव्यांग आरटीओ कार्यालयात जातात, तर हे आम्हाला माहीतच नाही, अस या अगोदर कोणाचं केलं आहे का ? असेल तर त्या आरसी कार्ड चा फोटो मागवा...... आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा करून कळवतो......असल्या उत्तराने भां

दिव्यांगजनांना होत असलेल्या अडचणी

 दिव्यांग हा समाजातील दुलक्षित घटक असल्याचे आज पण जाणवते. ही बाब १९७० अगोदर खूप प्रकर्षाने जाणवायची. नंतर १९९५ चा कायदा आला व आपले दिवस चांगले येतील अशी एक भावना प्रत्येक दिव्यांगजन यांची मनात पल्लवित झाली. हळूहळू जाणवायला लागलं की कायदा हा फक्त कागदावरच ठेवण्यासाठी बनवला आहे की काय ? त्यानंतर काही सामाजिक संघटना, खास करून अंध व्यक्तीसाठी झटणाऱ्या, पुढे आल्या.......त्या नंतर २००५ चा दिव्यांग कायदा अस्तित्वात आला. पण दिव्यांग हिताचं काम कागदावर जास्त व प्रत्यक्षात कमी असाच अनुभव येत होता. कामचुकार पणा केल्यास कडक कारवाही चे प्रयोजनाचा अभाव हे त्यामागील एक कारण असू शकते. एक गोष्ट मात्र नक्की होती, दिव्यांगजन यांना आपल्या प्रत्येक हक्कासाठी कोर्टात धाव घ्यावी लागत होती व आज पण घ्यावी लागते. कोर्ट हे दिव्यांगजनासाठी मायबाप म्हणूनच राहिले व आज पण आहे. २०१६ चा दिव्यांग हक्क कायदा, हा दिव्यांग हितासाठी एक मैलाचा दगड बनला. हे सर्व होऊन पण उदासीन प्रशासन व शासन यांच्यामुळे, आज पण दिव्यांग हक्कच विनासायास भेटत नाही, ही एक सत्य परिस्थिती व शोकांतिका आहे. हळूहळू बदल होत असले तरी आणखीन खूप काही होण